दूध संघाकडून शासन दरापेक्षा जास्त भाव
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:21+5:302016-02-05T00:33:21+5:30
जळगाव : जिल्हा दूध संघाकडून दूध उत्पादकांना शासन दरापेक्षा अधिक भाव देण्यात येत असल्याचे संघाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

दूध संघाकडून शासन दरापेक्षा जास्त भाव
ज गाव : जिल्हा दूध संघाकडून दूध उत्पादकांना शासन दरापेक्षा अधिक भाव देण्यात येत असल्याचे संघाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्हा दूध संघ गायीच्या दुधास ३१ जानेवारीपर्यंत २१ रुपये ६० पैसे प्रति लीटर दराने खरेदी करत होता. १ फेब्रुवारी पासून हे दर २१ रुपये करण्यात आले. या दुधासाठी शासनाचे दर २० रुपये आहेत. म्हशीच्या दुधास ३१ डिसेंबरपर्यंत ३७.८० लीटर असा दर दिला जात होता. १ जानेवारीपासून हे दर ३६.४० प्रति लीटर या दराने भाव दिला जात आहे. शासन हेच दूध २९ रुपये प्रति लीटर दराने खरेदी दर देते. त्यामुळे संघ शासकीय दरापेक्षा जास्त भाव उत्पादकांचे हीत लक्षात घेऊन देत असल्याचे संघातर्फे कळविण्यात आले आहे.