नारायण साईविरुद्ध लैंगिक शोषणाची आणखी तक्रार

By Admin | Updated: November 5, 2016 06:06 IST2016-11-05T06:06:37+5:302016-11-05T06:06:37+5:30

आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साईविरुद्ध आता एका महिला पत्रकाराने लैंगिक छळाची तक्रार दिली आहे.

More Complaint Against Sexual Harassment Against Narayan Sai | नारायण साईविरुद्ध लैंगिक शोषणाची आणखी तक्रार

नारायण साईविरुद्ध लैंगिक शोषणाची आणखी तक्रार


नोएडा : आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साईविरुद्ध आता एका महिला पत्रकाराने लैंगिक छळाची तक्रार दिली आहे. ही कथित घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. ‘२०१३ मध्ये स्थानिक वृत्तवाहिनीत काम करीत असताना नारायण साईची मुलाखत घेण्यासाठी मी दिल्लीच्या करोल बाग भागातील आश्रमात गेले होते. तेव्हा नारायण साईने आपला लैंगिक छळ केला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
‘पीडितेने घडल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांच्या कानावर घातली. तथापि, त्यांनी तक्रार न करण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडित महिलेने वृत्तवाहिनी सोडली’, असे शहर पोलीस अधीक्षक दिनेश यादव यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर गुरुवारी सायंकाळी नारायण साईविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या महिलेने काही छायाचित्रेही पोलिसांना दिली आहेत.
नारायण साईला सर्वप्रथम सुरत येथील महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून जेरबंद करण्यात आले होते. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने सातत्याने लैंगिक छळ केल्याची तक्रार पीडितेने दिली होती. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी नारायण साईने पोलीस, डॉक्टर्स, तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना लाच देण्याचा कथितरीत्या प्रयत्न केला होता. नारायण साईचे पिता आसाराम यांच्याविरुद्धही बलात्काराचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: More Complaint Against Sexual Harassment Against Narayan Sai