शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पंतप्रधान मोदींनी केली नोटाबंदी; तो धक्कादायक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 21:15 IST

तीन संस्थांनी अर्थ मंत्रालयाला दिला होता अहवाल

मुंबई: एकूण काळ्या पैशांपैकी 90 ते 97 टक्के काळा पैसा हा देशातच असल्याचं एका गुप्त अहवालातून समोर आलं आहे. 2014 मध्ये अर्थ मंत्रालयानं याबद्दल एक अभ्यास अहवाल मागवला होता. देशातल्या काळ्या पैशाचं प्रमाण लक्षणीय असल्याची आकडेवारी यातून समोर आली. याच अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं.  8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री अचानक नोटाबंदीची घोषणा केली. आजपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा 'कागज का तुकडा' ठरतील, असं मोदींनी म्हटलं होतं. त्यामुळे चलनातील 85 टक्के नोटा बाद झाल्या. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. एका गोपनीय अहवालातील आकडेवारीनंतर सरकारनंतर नोटबंदीचा निर्णय घेतल्याचं 'इंडिया टुडे'नं म्हटलं आहे. आर्थिक क्षेत्रातील तीन प्रतिष्ठीत संस्थांनी दिलेल्या माहितीवरुन हा अहवाल तयार करण्यात आला होता. डिसेंबर 2014 मध्ये हा अहवाल तयार झाला. मात्र तो अतिशय गुप्त राखण्यात आला. तीन संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरुन गोपनीय अहवाल तयार करण्यात आला. मात्र या तिन्ही संस्थांनी काळ्या पैशाबद्दल दिलेली आकडेवारी वेगवेगळी आहे. द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक फायनान्स अ‍ॅण्ड पॉलिसी (एनआयपीएफपी) या संस्थेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशाबाहेरील काळ्या पैशाचं प्रमाण देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.2 टक्के ते 7.4 टक्के इतकं आहे. या संस्थेनं 1997 ते 2009 दरम्यानच्या आकडेवारीवरुन अहवाल दिला होता. नॅशनल काऊन्सिल अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चनं (एनसीएईआर) दिलेल्या अहवालानुसार, देशाबाहेरील काळ्या पैशाचं मूल्य 384 बिलीयन डॉलर इतकं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 27 लाख कोटी रुपये होते. या संस्थेनं 1980 ते 2010 या काळात सर्वेक्षण तयार केला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटच्या (एनआयएफएम) अहवालानुसार, 1990 ते 2008 या कालावधीत देशाबाहेर गेलेल्या काळ्या पैशाचं एकूण मूल्य 9,41,387 कोटी रुपये होतं. 

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNarendra Modiनरेंद्र मोदी