अंगणवाडी सेविके वरील अत्याचाराच्या निषेधासाठी मोर्चा
By Admin | Updated: February 2, 2015 23:52 IST2015-02-02T23:52:57+5:302015-02-02T23:52:57+5:30
पुणे: दारुबंदीची मागणी करणा-या बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अंगणवाडी सेविकेला बेदाम मारहाणीच्या निषेर्धात सोमवारी अंगणवाडी कर्मचारी संभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तिव्र निषेध केला.

अंगणवाडी सेविके वरील अत्याचाराच्या निषेधासाठी मोर्चा
प णे: दारुबंदीची मागणी करणा-या बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अंगणवाडी सेविकेला बेदाम मारहाणीच्या निषेर्धात सोमवारी अंगणवाडी कर्मचारी संभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तिव्र निषेध केला. ध्वजारोहणासाठी चालेल्या अंगणवाडी सेविकेला अशा प्रकारे मारहाण करणे अत्यंत संतापजनक आहे. परंतु मारहाणाचा गंभीर प्रकार असताना देखील पोलिसांनी पद्मीनी, शहाजी आणि अमोल गव्हाणे यांच्या विरुध्द योग्य गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे दोषी व्यक्तींवर कडक कारवाई झालेली नाही. सरकारी कामात अडथळा व कामावर असताना कर्मचा-याला मारहाण या कलमाखाली गुन्हे दाखल करावेत, पिडित सेविकेला शासनाने त्वरीत आर्थिक व मानसिक सहाय्य व संरक्षण द्यावे आशी मागणी सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या तीन-चार महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांना पराकोटीचा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत सर्व अंगणवाडी सेविकांचे मानधन जमा करावा, असे सभेचे अध्यक्ष नीतिन पवार यांनी सांगितले.