शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 14:58 IST

देशामध्ये सध्या लहान मुली, महिला, तरुणींवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताहेत.

लखनौ - देशामध्ये सध्या लहान मुली, महिला, तरुणींवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणी BA द्वितीय वर्षांमध्ये शिकत होती. परीक्षा देऊन घराकडे परतत असताना काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उन्नाव सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात 6 बलात्काराच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  काही दिवसांपूर्वी इहाट येथे एका 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी वरात पाहायला गेलेल्या चिमुकलीचा बलात्कार करण्यात आला होता.

स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीसतर दुसरीकडे,  उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका बापानेच ३५ वर्षांची विवाहित मुलगी आपल्या मित्रांना बक्षीस म्हणून दिली आणि त्यांच्याबरोबरच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केला, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र तो बाप अद्याप फरार आहे. सीतापूरहून जवळच असलेल्या कमालपूर नावाच्या गावात जत्रा होती. तिथे हा बाप १५ एप्रिल रोजी मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने मानसिंह नावाच्या गुन्हेगार मित्राला बोलावून घेतले. सारे फिरायला जाऊ, असे सांगून मुलीला मानसिंहच्या बाइकवर बसायला सांगितले. तेथून मानसिंह तिच्यासह मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. तिथे त्याने व त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या बापानेही मुलीवर बलात्कार केला.

नंतर या महिलेला मेराजच्या घरी १८ तास कोंडून ठेवण्यात आले. तिची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर घरी येऊ न तिने हा सारा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच महिलेचा बाप, मानसिंह, मेराज आणि इतरांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मेराजला व अन्य दोघांना लगेच अटक करण्यात आली.  

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेश