पावसाळ्यात होणार १४ लाख रोपांची लागवड यावल वनविभाग : एक हजार १९ हेक्टरवर लागवड

By Admin | Updated: April 26, 2016 23:11 IST2016-04-26T23:11:29+5:302016-04-26T23:11:29+5:30

जळगाव : वनमहोत्सवांतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान धुळे वनवृत्तांतर्गत विविध ठिकाणी २१ लाख रोपांची लागवड होणार आहे. यावल वनविभागातर्फे १ जुलै रोजी सहा लाख २३ हजार वृक्षलागवड होणार आहे. तर पावसाळ्यात या विभागातर्फे १४ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

In the monsoon, 14 lakh saplings are planted in the same forest area: planting on one thousand hectare hectare | पावसाळ्यात होणार १४ लाख रोपांची लागवड यावल वनविभाग : एक हजार १९ हेक्टरवर लागवड

पावसाळ्यात होणार १४ लाख रोपांची लागवड यावल वनविभाग : एक हजार १९ हेक्टरवर लागवड

गाव : वनमहोत्सवांतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान धुळे वनवृत्तांतर्गत विविध ठिकाणी २१ लाख रोपांची लागवड होणार आहे. यावल वनविभागातर्फे १ जुलै रोजी सहा लाख २३ हजार वृक्षलागवड होणार आहे. तर पावसाळ्यात या विभागातर्फे १४ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
यावल वनविभागत २८४४.४४ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे. त्यात ६४ गाव परिसरात ८९७.०५ चौ.कि.मी. क्षेत्रात यावल वनविभागाचे क्षेत्र आहे. तर वन्यजीव विभागाचे १७५.५८ चौ.कि.मी.वनक्षेत्र आहे.

विविध योजनांमार्फत होणार लागवड
यावल वनविभागातर्फे या पावसाळ्यात कृत्रिम पुनर्निर्मिती, ओसाड जमिनीवर पुनर्वणीकरण करणे (आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्र), किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास करणे, कॅम्पा अंतर्गत बांबू लागवड करणे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत वनीकरण अशा विविध योजनांतर्गत रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

एक हजार १९ हेक्टरवर लागवड
यावल वनविभागातर्फे लागवड होणारे वृक्षारोपण हे एक हजार १९ हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. त्यात कर्जाणा वनक्षेत्रात २५, चोपडा वनक्षेत्रात १७९ हेक्टर, देवझरी वनक्षेत्रात ६५ हेक्टर, वैजापूर वनक्षेत्रात ८० हेक्टर, यावल पूर्व वनक्षेत्रात १४५, यावल पश्चिम वनक्षेत्रात १७५ हेक्टर, रावेर वनक्षेत्रात ३५० हेक्टरमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासाठी उनपदेव, लासूर, उमर्टी, देवझिरी, वैजापूर, यावल, नागादेवी, वाघझिरा, हरिपुरा, जामन्या, सहस्िंत्रग, गंगापुरी, पाल येथील रोपवाटिकांमधून रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

एका दिवसात सहा लाख रोपांची लागवड
वनमहोत्सवांतर्गत यावल वनविभागातर्फे एकाच दिवसात सहा लाख २३ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यात कर्जाणा- १७ हजार ६००, चोपडा -एक लाख सहा हजार ८००, देवझिरी - ४५ हजार ६००, वैजापूर- ५६ हजार ३००, यावल पूर्व-८० हजार ७००, यावल पश्चिम-९६ हजार ४१६, रावेर- दोन लाख १९ हजार ६०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी या रोपांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या गावांमध्ये होणार लागवड
यावल वनविभागातील अडावद, मामलदा, चौगांव, अंमलवाडी, लासूर, देवझिरी, मुळ्यावतार, मलापूर, कृष्णापूर, वड्री, बोरखेडा खुर्द, जानोरी, मोहमांडली, अंधारमळी, घोडापाणी, जामन्या, नागादेवी, हरिपुरा, जामन्या, मानापुरी, जामन्या, लालमाती, पाडल्या बुद्रुक, सहस्िंत्रग, कुसंुबा, गारखेडा, निमड्या या गावांमध्ये या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

Web Title: In the monsoon, 14 lakh saplings are planted in the same forest area: planting on one thousand hectare hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.