शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठी बातमी! Monkeypox चा धोका लक्षात घेत केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; लस बनवण्यासाठी काढलं टेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 20:33 IST

मंकीपॉक्सचा (Monkeypox) वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारकडून या रोगावर लस बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

नवी दिल्ली-

मंकीपॉक्सचा (Monkeypox)  वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारकडून या रोगावर लस बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारनं यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) म्हणजेच टेंडर काढलं आहे. मंकीपॉक्सवर लस निर्मिती करण्याची तयारी दाखवणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या किटसाठी हे टेंडर काढलं आहे. 

केंद्रानं हे टेंडर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप मोडमध्ये जाहीर केलं आहे. यात मंकीपॉक्स लस, संशोधन किट याचा समावेश असणार आहे. इच्छुक कंपन्या आपली दावेदारी १० ऑगस्टपर्यंत दाखल करू शकणार आहेत. खरंतर मंकीपॉक्ससाठीची लस याआधीपासूनच बाजारात अस्तित्वात आहे. पण मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी प्रयत्नांचं हे पाऊल समजलं जात आहे. मंकीपॉक्सचे भारतात आतापर्यंत पाच रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय काही संशयित रुग्ण देखील आहेत. ज्यांची चाचणी झाली असून अहवालाची प्रतिक्षा आहे. 

जगातील एकूम ७८ देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे १८ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण युरोपीयन देशांमधील आहेत. तर २५ टक्के रुग्ण अमेरिकन खंडातील आहेत. जगात मंकीपॉक्समुळे आतापर्यंत ५ जणांचा जीव गेल आहे. तर एकूण रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली आहे. 

तज्ज्ञांच्या मतानुसार काही गोष्टींची काळजी घेतली तर मंकीपॉक्सपासून नक्कीच बचाव करता येऊ शकतो. यात शारिरीक संबंधांवेळी काळजी बाळगणं याचाही समावेश आहे. WHO च्या मतानुसार या रोगाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ज्यामुळे आजारी मुलं, गर्भवती महिलांपर्यंत याचा प्रसार होणार नाही. 

गळाभेट आणि संक्रमितांचे कपडे वापरल्यानंही पसरू शकतो मंकीपॉक्सशारिरीक संबंधांशिवाय मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आल्यानंही याचा प्रचार होऊ शकतो. जसं की गळाभेट घेणं, संक्रमित व्यक्तीचा टॉवेल किंवा बेडशीट वापरणं यातून मंकीपॉक्सचा प्रसार होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMonkeyमाकडHealthआरोग्य