मनी पान- संयुक्त राष्ट्र संपत्ती
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
अति धनाढ्यांच्या यादीत

मनी पान- संयुक्त राष्ट्र संपत्ती
अ ि धनाढ्यांच्या यादीतभारताचा चौथा क्रमांकन्यूयॉर्क : दहा कोटी डॉलर व त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या अति धनाढ्य कुटुंबांच्या संख्येमध्ये भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. या यादीत अमेरिका अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहे.बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (बीसीजी) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात चीन व भारत आर्थिक विकास कायम राहिल्यामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रातील लोकांच्या संपत्तीत वाढ होत आहे. अति धनाढ्यांची संख्या अमेरिकेत २०१४ मध्ये ५,३०२ होती. त्यानंतर चीन (१,०३७), ब्रिटन (१,०१९), भारत (९२८) आणि जर्मनीचा (६७९) क्रम लागतो. भारतात अति श्रीमंतांची संख्या २०१३ मध्ये २८४ होती. एक वर्षात त्यात तीन पट वाढ झाली. आशिया प्रशांत क्षेत्रात खासगी संपत्तीमध्ये २०१४ मध्ये २९ टक्के वाढ होऊन ४७,००० अब्ज डॉलर झाली आहे. पूर्व आणि पश्चिम युरोपला मागे टाकून आशिया प्रशांत क्षेत्राने जगात दुसरे स्थान मिळविले आहे.अहवालानुसार आशिया प्रशांत (जपान वगळून) २०१६ मध्ये अंदाजे ५७,००० अब्ज डॉलरच्या खासगी संपत्तीसह उत्तर अमेरिकेला (५६,००० अब्ज डॉलर) मागे टाकेल.