मनी पान- नियुक्त्या
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:08+5:302015-04-13T23:53:08+5:30
मार्चमध्ये नोकर्या

मनी पान- नियुक्त्या
म र्चमध्ये नोकर्या९ टक्क्यांनी वाढल्यानवी दिल्ली : देशात गेल्या मार्च महिन्यात नोकर्यांमध्ये (नियुक्त्या) ९ टक्क्यांची वाढ झाली. रोजगार बाजारपेठेत तेजीचे वातावरण असून बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या बळावर मार्चमध्ये नोकर्यांचे प्रमाण वाढले, असे अहवालात म्हटले आहे.नोकरी जॉब स्पीक सूचकांक गेल्या महिन्यात १,६०९ वर होता. मार्च २०१४ च्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली. नोकरी डॉट कॉमचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य विक्री अधिकारी व्ही. सुरेश म्हणाले की,'सध्या वातावरण सकारात्मक असून हा सूचकांक वाढण्याची आशा आम्हाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात सावधगिरीसह आशा आहे. माझ्या मते २०१५-२०१६ वर्ष वेगवेगळ्या शहरात व उद्योगांत नोकरी शोधणार्यांसाठी आनंदाची बातमी देणारे असेल.' दरवर्षी ज्या क्षेत्रात सर्वात जास्त नोकर्यांची संख्या वाढली त्यात बँकिंग आणि आर्थिक सेवा, लेखा आणि वित्तचा समावेश आहे. मार्च २०१५ मध्ये लेखा आणि वित्त, माहिती तंत्रज्ञान, जाहिरात, जनसंपर्क, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् व तेल आणि वायू क्षेत्रांत वार्षिक आधारावर नोकर्यांमध्ये अनुक्रमे ४३, २७ व १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.