मनी पानासाठी - लीड
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
हे अत्यंत महत्वाचे वृत्त असून, ज्या आवृत्यांना ते पान १ वर वापरायचे आहे, त्यांनी संपादकांच्या अनुमतीने मनी पानावरून काढून पान १ वर वापरावे.
मनी पानासाठी - लीड
हे अत्यंत महत्वाचे वृत्त असून, ज्या आवृत्यांना ते पान १ वर वापरायचे आहे, त्यांनी संपादकांच्या अनुमतीने मनी पानावरून काढून पान १ वर वापरावे.- चंद्रशेखर कुलकर्णी------------------रायसोनी पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच!केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आदेश : संचालकांची सुनावणी घेणार, प्रशासक नेमण्याची तयारी- १२ हजार कोटींवर घोटाळा- ठेवी परत करण्यासाठी पतसंस्थेला केंद्राचे पत्ररघुनाथ पांडेनवी दिल्ली : जळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळयाासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले. तर, केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्था बंद करण्याचा इशारा पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी कायदा २००२ नुसार मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश लवकरच काढण्यात येणार असून सध्या पतसंस्थेचे संचालक अटकेत असल्याने त्यांची सुनावणी दिल्लीत घेण्याची प्रक्रिया कशी असेल, त्यावरही विधी विभागाचे मत मागविण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्राने सांगितले. शिवाय केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्थेच्या प्रबंध संचालकांना तीन मार्च रोजी नोटीस देऊन ठेवीदारांना त्यांची रक्कम १५ दिवसांत परत करण्याचे सांगून तसे न केल्यास पतसंस्था बंद (वाईंडअप)करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्र दिले आहे. भारतीय रिझर्व बँक, नाबार्ड, पुण्याचे सहकार सहायक निबंधक, दोन खासदार यांच्यासह जळगाव, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी, सोलापूर येथील तब्बल २२१ तक्रारकर्त्यांनी या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबद्दल गेल्या तीन महिन्यात पत्रे दिली. त्यातून हा घोटाळा १२ हजार कोटींवर असल्याचे कृषिविभागातील सहकार विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत लक्षात आल्याने बुधवारी कृषिमंत्री सिंह यांनी बुधवारी ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना देत पंतसंस्था अवसायनात टाकून त्यावर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करा,अशी ताकीद दिली. सहकार विभागाचे कायदा संचालक पी. संपथ व केंद्रीय सहकार विभागाचे उपसंचालक जितेंदर नागर यांनी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोकांचा कष्टाचा पैसा पतसंस्थेत अडल्याने त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज येणार नाही, त्यामुळे खातेदारांची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. ---------------------जंतरमंतरवर उपोषणभाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तसेच ठेवीदाराना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी केंद्र सरकाने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदार राजधानीतील जंतरमंतर येथे २६ मार्चासून उषोषण करणार आहेत.