मनी पेज : स्टॉक मार्केट
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30
सेन्सेक्स १६१ अंकांनी तेजीत

मनी पेज : स्टॉक मार्केट
स न्सेक्स १६१ अंकांनी तेजीतशेअर बाजार : कारखाना उत्पादन समाधानकारक राहिल्याचा परिणाममुंबई : नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २६,५८६.५५ अंकांवर बंद झाला. कारखाना उत्पादनाची आकडेवारी समाधानकारक राहिल्यामुळे बाजारात तेजी परतली आहे. महागाईचा पारा आणखी खाली आल्याचाही चांगला परिणाम बाजारात दिसून आला.मान्सूनची दमदार सुरुवात झाल्यामुळेही बाजाराची धारणा वाढली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने आज जोरदार उसळी घेतली. एका क्षणी तो २६,७२८.६0 अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर मात्र नफा वसुलीचा जोर बाजारात वाढला. त्यामुळे सेन्सेक्स थोडा खाली आला. तथापि, सत्राच्या अखेरीस तो १६१.२५ अंकांची अथवा 0.६१ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २६,५८६.५५ अंकांवर बंद झाला. आदल्या सत्रात सेन्सेक्सने ५४.३२ अंकांची वाढ मिळविली होती.५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८ हजार अंकांची पातळी ओलांडण्यात यशस्वी ठरला. ३१ अंकांची अथवा 0.३९ टक्क्यांची वाढ नोंदविणारा निफ्टी ८,0१३.९0 अंकांवर बंद झाला. सन फार्मा, बजाज ऑटो, एचडीएफसी आणि आरआयएल या कंपन्यांचे समभाग वाढल्याने सेन्सेक्सचा आलेख वर चढला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. केयर्न इंडियाचा समभाग ३.७९ टक्क्यांनी वाढला. वेदांताचा समभाग मात्र १.४९ टक्क्यांनी घसरला. व्यापक पातळीवर मात्र बाजारात संमिश्र कल दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.४२ टक्क्यांनी वाढला. मीडकॅप मात्र 0.0१ टक्क्यांनी घसरला. त्याआधी शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात ६७0.९६ कोटींचे समभाग विकल्याचे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. जागतिक पातळीवर आशियाई बाजारात घसरणीचा कल दिसून आला. युरोपीय बाजारांतही सकाळी घसरणीचा कल होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)