सहा अभियंत्यांच्या निलंबनाबाबत सोमवारी सुनावणी मनपा: आयुक्तांनी तारीखवार मागविली माहिती
By Admin | Updated: October 22, 2016 00:43 IST2016-10-22T00:43:26+5:302016-10-22T00:43:26+5:30
जळगाव: मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या निलंबन रद्द करण्याच्या फाईलचा प्रवास उपायुक्तांच्या लाच प्रकरणानंतरही सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(एसीबी) ही फाईल मनपाला प्राप्त झाली असून त्यातील काही मुद्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण मागविले आहे. दरम्याने सोमवार २४ रोजी याबाबत संबंधित अभियंत्यांचे याबाबतचे म्हणणे आयुक्त ऐकून घेणार आहेत.

सहा अभियंत्यांच्या निलंबनाबाबत सोमवारी सुनावणी मनपा: आयुक्तांनी तारीखवार मागविली माहिती
ज गाव: मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या निलंबन रद्द करण्याच्या फाईलचा प्रवास उपायुक्तांच्या लाच प्रकरणानंतरही सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(एसीबी) ही फाईल मनपाला प्राप्त झाली असून त्यातील काही मुद्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण मागविले आहे. दरम्याने सोमवार २४ रोजी याबाबत संबंधित अभियंत्यांचे याबाबतचे म्हणणे आयुक्त ऐकून घेणार आहेत. मनपा नगररचना विभागातील सहायक नगररचनाकार अरविंद भोसले यांच्यासह ६ जणांनी सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या समर्थनार्थ व महासभेने केलेल्या ठरावाविरोधात शासनाकडे पत्र दिले होते. त्यावरून महासभेत जोरदार चर्चा होऊन या सर्व अभियंत्यांना बडतर्फ करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. मात्र नंतर त्यात बदल करून निलंबन करण्याचा व चौकशी करून बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी या सहा अभियंत्यांना निलंबित केले होते. मात्र त्यांची बदली झाल्याने पदभार सोडण्यापूर्वी या सहा अभियंत्यांना ताकीद देऊन निलंबन मागे घेण्याचा शेरा तत्कालीन आयुक्तांनी टिपणीवर दिला होता. मात्र त्याबाबतचे आदेश पारित झाले नव्हते. याप्रकरणी टिपणी मंजुरीला ठेवण्यासाठी ५० हजारांची लाच स्विकारताना उपायुक्त राजेंद्र फातले यांना अटकही झाली. त्यानंतर एसीबीने ही फाईल जप्त केली होती. ती फाईल १७ ऑक्टोबर रोजी मनपाला परत देण्यात आली. आयुक्त जीवन सोनवणे यांनी या फाईलची पाहणी केली असता त्यातील विविध प्रकारचे ठराव व आदेश यांची माहिती क्रमाने नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतचे आदेश, निर्णय, ठराव आदीची तारीखनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही फाईल उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याकडे व तेथून आस्थापना विभागात पाठविण्यात आली आहे. २४ रोजी सुनावणीमनपा आस्थापना विभागाकडून या प्रकरणाची तारीखनिहाय माहिती मिळालेली नसल्याने याबाबत संबंधित अभियंत्यांचे म्हणणेही सोमवारी २४ रोजी आयुक्त ऐकून घेणार आहेत. त्याच दिवशी आस्थापना विभागाकडून फाईलही सादर होणार आहे. त्याच दिवशी या प्रकरणी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.