शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 10:16 IST

ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई - व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर जास्त वेळ घालवता असाल तर जरा सावधान. कारण अनेक धोकादायक गेम्सची सध्या चलती आहे. ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. 

मोमो नावाचं हे नवीन चॅलेंज ब्ल्यू व्हेलसारखंच आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं. त्यामुळे कोणताही अनोळखी नंबर सेव्ह करताना जरा काळजी घ्या. ज्या व्यक्तीला टार्गेट करायचे असेल त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून मोमो चॅलेंजचा मेसेज पाठवला जातो. त्या क्रमांकावर ‘मोमो’ असा रिप्लाय द्यायचा आहे. हा रिप्लाय दिल्यानंतर त्या व्यक्तीला चित्रविचित्र फोटो पाठवले जातात.  

मोमो चॅलेंजमध्ये एका महिलेचा विचित्र फोटो आहे. या महिलेचे डोळे बाहेर आले असून एक विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे. या गेममध्ये वेगवेगळे टास्क दिले जातात. हे टास्क पूर्ण केले नाही तर कठोर शिक्षा देण्याची धमकी दिली जाते. मोमो चॅलेंजच्या माध्यमातून धमकी मिळल्यानंतर युजर घाबरतो आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यास तयार होतो. गेम खेळताना अनेक जण नैराश्यात जातात. तसेच पुढे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. हा जीवघेणा खेळ लहान मुलांना आणि तरुणांना प्रामुख्याने टार्गेट करतो. 

असं आहे मोमो चॅलेंज

- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं. 

- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते. 

- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.

- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं. 

- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप