सासर्याकडून सुनेचा विनयभंग
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30

सासर्याकडून सुनेचा विनयभंग
>श्रीरामपूर : सासर्याने सुनेचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार श्रीरामपूरमध्ये घडला.याबाबत पिडित २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या सासर्याविरूद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला जर्मन हॉस्पिटलमागे असणार्या डॉक्टर क्वॉर्टर्समध्ये पतीसोबत राहते. २५ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिचा पती जर्मन हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेव्हा ती घरात एकटीच असल्याची संधी साधून तिचा सासरा आरोपी शशीकांत काशीनाथ शेळके याने तिच्या खोलीत येऊन तिचा हातात घेऊन तिचे चुंबन घेऊन लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. २५ ऑगस्टला घडलेल्या घटनेची या पिडित महिलेने ७ सप्टेंबरला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिचा सासरा शशीकांत शेळके याच्याविरूद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँस्टेबल व्ही. एम. ठोंबरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)----------------------------------------------माहितीसाठीफिर्यादीचे नाव: प्रतीक्षा शिरीष शेळके (वय २२, घरकाम, रा. जर्मन हॉस्पिटल, श्रीरामपूर)