शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: February 20, 2015 01:09 IST2015-02-20T01:09:55+5:302015-02-20T01:09:55+5:30
शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग
श कवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंगनागपूर : शिकवणीवरून घरी परतणाऱ्या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता गौसिया कॉलनी रिंगरोडच्या वळणाावर घडली. १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणी आटोपून घरी परतत होती. आरोपी अभय सदानंद मेहर रा. अयोध्यानगर याने त्याच्या ॲक्टिव्हा गाडीने तिचा पाठलाग करून तिला गौसिया कॉलनी रिंगरोडच्या वळणावर थांबविले. तू माझ्याशी बोलत नाही, माझा मोबाईल उचलत नाही, असे आरोपीने तिला म्हटले. मुलीने बोलण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्याजवळील बॅग हिसकावून निघून गेला. बॅगमध्ये तीन हजार रुपये रोख, काळ्या रंगाचा मोबाईल किंमत एक हजार, मोटारसायकलची चावी असा एकूण चार हजाराचा मुद्देमाल होता. तिने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.