तरुणीचा पाठलाग करून विनयभंग
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:21+5:302015-02-15T22:36:21+5:30
नागपूर : तरुणीला बदनामी करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या श्रीकांत आडे (वय ४५, रा. बेसा) नामक आरोपीविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित (वय २१) तरुणीचा आरोपी आडेने ७ फेब्रुवारीपासून मानसिक छळ सुरू केला. तो तिचा नेहमी पाठलाग करीत होता. शनिवारी सकाळी ९.३० वाजता त्याने अशाचप्रकारे तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून आडेने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग
न गपूर : तरुणीला बदनामी करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या श्रीकांत आडे (वय ४५, रा. बेसा) नामक आरोपीविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित (वय २१) तरुणीचा आरोपी आडेने ७ फेब्रुवारीपासून मानसिक छळ सुरू केला. तो तिचा नेहमी पाठलाग करीत होता. शनिवारी सकाळी ९.३० वाजता त्याने अशाचप्रकारे तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून आडेने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.----