मोहपा...

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

मोहपा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस

Mohapa ... | मोहपा...

मोहपा...

हपा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
शेतकरी त्रस्त : सौरऊर्जेवरील तारेच्या कुंपणाची मागणी
मोहपा : परिसरातील बुधला, लोहगड, रामगिरी, खैरी, पारडी (देशमुख), पिल्कापार, मांडवी, खुमारी, जिरोला, वाठोडा, सोनोली (रिठी) सवंद्री, सुसुंद्री आदी शिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्व्यापामुळे पिके नष्ट होत आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शासनाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी सौरऊर्जेवरील तारेचे कंुपण शेतकऱ्यांना पुरवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या परिसरातील शेत शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. जंगली प्राणी कळपाने पिकांत धुडगूस घालीत असल्यामुळे पिके नष्ट होतात. या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अनेकदा निवेदने सादर केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. दिवसभर शेतात राबल्यानंतर शेतकऱ्यांना रात्र शेतात जागून काढावी लागत आहे. रानडुक्कर, रोही आदी प्राण्यांचे कळप शेतात शिरतात, अशावेळी शेतकऱ्यांच्या जीवास धोका निर्माण होतो, तसेच पिकांचेही मोठे नुकसान होते.
या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण पुरवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी बुधला येथील उपसरपंच परसराम कठाणे, भीमराव निमकर आदींसह शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Mohapa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.