मोहपा...

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:05+5:302014-12-25T22:41:05+5:30

शौचालय योजनेला अल्प प्रतिसाद

Mohapa ... | मोहपा...

मोहपा...

चालय योजनेला अल्प प्रतिसाद
मोहपा : स्थानिक नगर परिषद कमी खर्चाची स्वच्छता योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत शौचालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ९००० रुपये अनुदान व लोकसहभागातून एक हजार रुपये लाभार्थ्यांना भरावे लागत आहे. अशी दहा हजार रुपयांची स्वच्छता योजना लाभार्थ्यांसाठी आहे. परंतु, या योजनेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने योजनेतील निधी परत जाण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे.
नगर परिषदेने ८ जुलै २०११ च्या विशेष सभेत ठरावात या योजनेंतर्गत सर्व्हेक्षण केले. त्यानुसार गावात ३६२ शौचालये केले जाणार आहे. आतापर्यंत १२५ कमी खर्चाच्या शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. योजनेतील उद्दिष्टांपैकी जवळपास २३७ शौचालयाचे बांधकाम शिल्लक आहे. ही शौचालये पूर्ण न झाल्यास शासनाकडून प्राप्त झालेला निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे नगराध्यक्ष समसुद्दीन शेख युसूफ यांनी सांगितले.
मोहपा हे गाव गोदरीमुक्त व्हावे, यासाठी नगर परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेने प्रशासनाने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Mohapa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.