Swami Rambhadracharya RSS Mohan Bhagwat: संभलमध्ये उत्खननात मंदिर सापडल्यानंतर देशात मंदिर-मशीद मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक दिवशी मंदिर-मशिदीचा नवीन मुद्दा मांडला जात आहे. हे योग्य नाही, असे म्हटले होते. त्यावर स्वामी रामभद्राचार्य यांनी टीका केली आहे. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत, हिंदू धर्माचे नाहीत, असे स्वामी भद्राचार्य म्हणाले.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एक विधान चर्चेत आहे. मंदिर-मशीद मुद्दे जाणिवपूर्वक उपस्थित केले जात आहेत. सगळ्यांनी एकत्र राहायला हवे,' असा प्रश्न स्वामी भद्राचार्य यांना विचारण्यात आला होता.
स्वामी भद्राचार्य म्हणाले, "एकत्र झाले पाहिजे, पण आपले ऐतिहासिक स्थळे दुसऱ्याला थोडी दिले पाहिजे. ही मोहन भागवत यांचे व्यक्तिगत भूमिका असू शकते. ही सगळ्यांची भूमिका नाहीये."
मोहन भागवत हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत -स्वामी भद्राचार्य
"मोहन भागवत हे कोणत्या एका संघटनेचे प्रमुख असू शकतात, ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. त्यामुळे त्यांचे म्हणणे आम्ही ऐकत नाही. ते आमचे अनुशासक नाहीत, आम्ही त्यांचे अनुशासक आहोत", अशी भूमिका स्वामी भद्राचार्य यांनी मांडली.
"मी २० वेळा सांगतोय, ते हिंदू धर्म व्यवस्थेचे ठेकेदार नाहीत. हिंदू धर्म व्यवस्था हिंदू धर्माच्या आचार्यांच्या हातात आहे. त्यांच्या हाता नाहीये. ते कोणत्या एका संघटनेचे प्रमुख बनू शकतात, पण आमचे प्रमुख नाहीत. ते सगळ्या भारताचे प्रतिनिधी नाहीत", असे स्वामी रामभद्राचार्य म्हणाले.
"मोहन भागवतांचं विधान दुर्दैवी"
"राम मंदिर उभारल्यानंतर काही लोकांना असं वाटतंय की ते नवीन जागांबद्दल असाच मुद्दा उचलून हिंदूंचे नेता बनू शकतात. हे स्विकारण्यासारखं नाही", असे मोहन भागवत म्हणाले होते.
त्याच्या या विधानाबद्दल स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, "त्यांचे हे विधान दुर्दैवी आहे. त्यांना काय मिळालं नाहीये. त्यांना सगळं काही मिळालं आहे. त्यांनी काहीही चांगलं म्हटलेलं नाही. हे खूप दुर्दैवी आहे."