शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'रामनवमीला दंगल घडविण्यासाठी मोहन भागवतांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:53 IST

या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले.

पाटणा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा कट आखला होता, असा गंभीर आरोप लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनी केला. ते शुक्रवारी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यांनी म्हटले की, मोहन भागवत नुकतेच 14 दिवसांसाठी बिहारमध्ये येऊन गेले. या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. त्यांना रामनवमीच्या काळात बिहारमध्ये दंगल घडवून आणायची होती, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले.  

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये धार्मिक तंट्यांमुळे तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे रामनवमीनंतरच या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भागलपूर, औरंगाबाद, नालंदा आणि समस्तीपुर आणि नवादा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आज सकाळीच नवादा येथे हिंसक आंदोलन झाल्याचे समजते. नवादा परिसरातील गोंदापूर चौकात एका धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्यावरून हा वाद पेटला होता. या घटनेनंतर संबंधित समुदायाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शने केली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तर औरंगाबाद येथे पोलिसांवर दगडफेक झाली. तेथेदेखील पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केल्याचे समजते. बिहारमधील वातावरण बिघडवण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले होते.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतTejashwi Yadavतेजस्वी यादवRam Navamiराम नवमीBiharबिहार