शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद फैजल यांना दोन महिन्यातच खासदारकी परत मिळाली; राहुल गांधींकडे काय पर्याय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:48 IST

राज्याबाहेरील राष्ट्रवादीचे एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना बुधवारी खासदारकी परत मिळाली. आता या प्रकरणाशी राहुल गांधींचे प्रकरण जोडले जात आहे.

Rahul Gandhi News : लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल( NCP MP Mohmmad Faizal) यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा त्यांना बहाल करण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द केल्यानंतर त्यांचे सदस्यत्व परत करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती, त्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाली. यानंतर तात्काळ त्यांना लोकसभेने त्यांचे सदस्यत्व बहाल केले. आता हे प्रकरण राहुल गांधींशी (Rahul Gandhi) जोडले जात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व गेले आहे. मोदी आडनाव प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली, त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयावरुन भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशातच राहुल गांधींची खासदारकी त्यांना परत मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यातच राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचे संसद सदस्यत्व परत मिळणे, राहुल गांधींच्या प्रकरणात महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.

असा आहे संपूर्ण घटनाक्रमराहुल गांधी आणि मोहम्मद फैजल यांची तुलना करायची असेल तर आधी राष्ट्रवादीच्या खासदाराची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. 11 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकच्या कावरत्ती सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना खुनाच्या प्रयत्न प्रकरणात दोषी ठरवून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर 12 जानेवारी रोजी मोहम्मद फैजलने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरळ उच्च न्यायालयात अपील केले. 13 जानेवारी रोजी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करुन त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर 18 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने लक्षद्वीपमधील पोटनिवडणुकीची घोषणा केली. फैजल यांनी आयोगाच्या प्रेस नोटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यानंतर 25 जानेवारी रोजी केरळ उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द केली. यानंतर 27 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय घेईल.

दोन महिन्यात खासदारकी मिळालीयानंतर मोहम्मद फैजल यांनी सातत्याने अनेक निवेदने दिली होती, मात्र लोकसभेचे सदस्यत्व मिळवण्याची 13 जानेवारीची अधिसूचना मागे घेण्यात आली नव्हती. यानंतर अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादाच्या आधारे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसात फैजल यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.

राहुल गांधींकडे 30 दिवसांचा वेळ आता राहुल गांधींच्या केसकडे पाहता, सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 'मोदी आडनाव' टिप्पणीसाठी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडे आता 30 दिवसांची मुदत आहे. राहुल गांधी प्रकरणात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आणि त्यांना दोषी ठरवणाऱ्या निकालाला स्थगिती दिल्यानंतरच खासदार किंवा आमदार अपात्रतेपासून वाचू शकतात. कोणताही लोकप्रतिनिधी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आपोआप अपात्र ठरतो. आता शिक्षेला स्थगिती दिल्यास अपात्रताही आपोआप संपेल. अशा परिस्थितीत या 30 दिवसांवर बरेच काही अवलंबून असणार आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLakshadweep Lok Sabha Election 2019लक्षद्वीप लोकसभा निवडणूक 2019Member of parliamentखासदारlok sabhaलोकसभा