निर्मल भारत गैरव्यवहारातील म्होरक्या शरण मोहोळ तालुका: मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर झाला हजर

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

मोहोळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्‍या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे तो अखेर एक वर्षानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात हजर होऊन शरण आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Mohall taluka of Nirmal Bharat miscreants: Mumbai High Court gets bail after rejecting bail | निर्मल भारत गैरव्यवहारातील म्होरक्या शरण मोहोळ तालुका: मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर झाला हजर

निर्मल भारत गैरव्यवहारातील म्होरक्या शरण मोहोळ तालुका: मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर झाला हजर

होळ: जिल्?ासह राज्यभर गाजलेल्या मोहोळ तालुका पंचायत समितीमधील निर्मल भारत अभियानांतर्गत लाभार्थींना प्रोत्साहनपर देण्यात येणार्‍या वैयक्तिक अनुदानात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला व मास्टर माईंड शिक्षक हजरत इब्राहिम शेख याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे तो अखेर एक वर्षानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात हजर होऊन शरण आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
सन 2013 मध्ये पंचायत समितीकडे निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय लाभार्थींना वैयक्तिक प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 4 हजार 60 रुपयांप्रमाणे 1 कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले होते. यात बोगस लाभार्थी, एकाच व्यक्तिीच्या नावे दोनवेळा ते 23 वेळापर्यंत एकाच परिवाराला हजारो रुपयांचे अनुदान बोगस पद्धतीने वाटप केले. यात 60 ते 70 कोटींचा घोटाळा झाला होता. माहिती अधिकारात दिलेल्या अर्जानुसार घोटाळा निष्पन्न झाला होता. याबाबत सातत्याने उठाव केल्यानंतर प्राथमिक स्वरूपात चौकशी करून 4 जून 2014 रोजी गटविकास अधिकारी संजय आळतेकर यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळेसह 13 जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात 29 लाख 80 हजारांचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्?ामध्ये आजतागायत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु मास्टर माईंड शिक्षक हजरत शेख हा गेल्या वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन दाखल केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर 15 जून रोजी तो मोहोळ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. डी. बी. हंबिरे यांनी 19 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 13 वा आरोपी स्वच्छता प्रेरक समीर भारत गायकवाड (रा. कामती) हा अद्याप फरार आहे.
मध्यस्थीही गजाआड
तपास अधिकारी सपोनि सचिन म्हेत्रे यांनी या घोटाळ्यात एकाच घरात 23 वेळा लाभ घेणारा व अनेकांना लाभ मिळवून घोटाळ्यातील आरोपींना पैसे मिळवून देणारा पोखरापूर येथील नामदेव काळे याला आरोपी करून त्याला अटक केली आहे. त्यालाही न्यायाधीशांनी 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.
व्याप्ती वाढण्याची शक्यता
शौचालय घोटाळ्यातील आणखी तपास बाकी आहे. आणखी आरोपी व गैरव्यवहाराची रक्कम वाढण्यास या मास्टर माईंडची मदत होणार आहे.

Web Title: Mohall taluka of Nirmal Bharat miscreants: Mumbai High Court gets bail after rejecting bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.