मोहोळ बातमी
By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:45+5:302015-08-11T00:03:45+5:30
मोहोळ :

मोहोळ बातमी
म होळ : ग्रामपंचायतीच्या परस्पर बेकायदेशीरपणे ग्रामपंचायतीच्या खात्यातून २६ लाख ८१ हजार रूपये काढून अपहार केल्याप्रकरणी वाफळे येथील तत्कालीन ग्रामसेवक व माजी सरपंचावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाफळे येथील सरपंच भगवान अशोक पाटील यांचा सरपंचपदाचा कालावधी डिसेंबर २०१२ पूर्वी संपला़ त्यानंतर पद्मिनी महादेव वाघमारे या सरपंच झाल्या़ त्यांनी ग्रामसेवक समाधान मनोहर जाधव यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत विचारणा केली असता जाधव यांनी ते पैसे परस्पर काढल्याचे समजले यावरून वाघमारे यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती़त्यानुसार ग्रामसेवक व सरपंचांनी २ फेबु्रवारी २०१३ ते २३ एप्रिल २०१४ या कालावधीत ग्रा़प़ंवाफळे येथील कोणताही निधी काढण्याची परवानगी नसताना ग्रामसेवक समाधान जाधव, माजी सरंपच भागवत पाटील यांनी युनियन बँक आफ इंडिया, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या शाखेतून संगनमताने २६ लाख ८१ हजार रूपयांचा अपहार करून सरपंच पद्मिनी वाघमारे यांना अधिकारापासून वंचित ठेवल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़