मोदींच्या ट्विटचा लालूंनी घेतला समाचार!

By Admin | Updated: March 11, 2017 21:53 IST2017-03-11T21:53:37+5:302017-03-11T21:53:37+5:30

लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत

Modi's tweet was taken by Lalu! | मोदींच्या ट्विटचा लालूंनी घेतला समाचार!

मोदींच्या ट्विटचा लालूंनी घेतला समाचार!

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - राष्ट्रीय राजकारणात लालूप्रसाद यांची प्रचंड लोकप्रियता आहे. चारा घोटाळ्यामुळे जेलची हवा खाऊन आलेले लालूप्रसाद मिश्किल टीका-टिपणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही लालूंच्या राष्ट्रीय जनता दलानं जनता दल युनायटेडशी युती करत बिहारमध्ये मोठा विजय मिळवला होता. मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये मोदी लाटेत विरोधक वाहून गेल्यानं लालूंचीही तोफ धडाडली आहे.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लालूप्रसाद यादव यांना खोचक सवाल विचारला, त्याला लालूप्रसाद यादवांनी हटके स्टाइलनं उत्तर दिलं आहे. सुशीलकुमार मोदींनी लालूप्रसाद यादवांना ट्विट करून विचारलं की, क्या हाल है ?, त्यानंतर लागलीच लालूप्रसाद यादव यांनी रिट्विट करत मोदींच्या ट्विटला कोट करून चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ठीक बा । देखा ना, बीजेपी ने तुम्हें यूपी में नहीं घुसने दिया तो फायदा हुआ।, असं म्हणत सुशीलकुमार मोदींवरच निशाणा साधला.

मात्र दोघांचं हे ट्विटर वॉर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर हे ब-याच जणांनी रिट्विट केलं आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही लालू यादव यांनी मोदींवर अनेक वेळा टीका केली होती. एकदा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने कालिया नागाने कलयुगात पुर्नजन्म घेतला असून आम्ही कृष्णाप्रमाणेच या नागाला बिहारमधून पळवून लावू, अशा तिखट शब्दांत त्यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. 
(नरेंद्र मोदी हे कलयुगातील कालिया नाग - लालूप्रसाद यादव)
(नरेंद्र मोदी बनलेत'NRI, त्यांना बनवा 'जगाचे पंतप्रधान' - लालूप्रसाद यादव)

चारा घोटाळा करून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच्या चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात सीबीआयच्या दुसऱ्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य आरोपींना चाईबासाप्रकरणी २०१४मध्ये शिक्षा ठोठावली होती, तूर्तास ते जामिनावर आहेत.

Web Title: Modi's tweet was taken by Lalu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.