मोदींचा शपथविधी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता

By Admin | Updated: May 20, 2014 15:57 IST2014-05-20T15:54:24+5:302014-05-20T15:57:30+5:30

सोमवारी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Modi's swearing on May 26 at 6 pm | मोदींचा शपथविधी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता

मोदींचा शपथविधी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २० - सोमवारी २६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. मोदी यांची मंगळवारी भाजपाच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर घटक पक्षाच्या नेत्यांसह मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली व त्यांच्याकडे ३३६ खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले.

मुखर्जींनी मोदींचे अभिनंदन केले व त्यांना सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. मोदींनी २६ मे ही तारीख शपथविधीसाठी निश्चित केली असून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी ६ वाजता हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे २००० निमंत्रित अपेक्षित आहेत.

मोदींसमवेत भाजपाचे २० ते २२ मंत्रीही शपथ घेतील अशी अटकळ असून याबाबत निश्चित अशी माहिती मिळू शकलेली नाही.

Web Title: Modi's swearing on May 26 at 6 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.