शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या विधानाने जगाच्या केंद्रस्थानी भारत, चीनविरुद्ध एकजूट, फिलिपिन्स, इंडोनेशियाही अँटी चायना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:51 IST

चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता चीनला विस्तारवादी म्हटल्याने आशिया खंडातील चीनविरोधी देश एकवटले आहेत. चीनच्या अरेरावीपुढे न झुकण्याचे संकेत आता इंडोनेशियाने दिले आहेत. जपानने आधीच भारताची  पाठराखण केली. तर नेपाळमध्ये चीनधार्जिणे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचे पद संकटात सापडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्यानंतर परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रमुख देशांच्या दूतावासातील अधिका-यांशी संपर्क साधला. परराष्ट्र खात्यातीलू सूत्रांच्या माहितीनुसार. इंडोनेशिया. फिलिपिन्स, जपान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान दूतावासाशी संपर्क साधून चीनचा विस्तारवादी चेहरा उघड केला.दक्षिण चीन समुद्रात चीनला विरोध करण्यासाठी या देशांना भारताने बळ देण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय जगतात राजनैतिक चर्चामध्ये चीनविरोधामुळे भारत केंद्रस्थानी आला आहे. फिलिपिन्स, इंडोनेशियातदेखील चीनविरोधात लोकांमध्ये रोष आहे. दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांनी त्यास ठळकपणे प्रसिद्धी दिली. दक्षिण चीन समुद्रात चीनने युद्धनोका सराव सुरू केल्याने या देशांमध्ये घबराट आहे. फिलिपिन्स व इंडोनेशियाने त्यास आक्षेप घेतला. केवळ जमीनच नव्हे तर समुद्रातदेखील चीनने विस्ताराची महत्त्वकांक्षा बाळगली असल्याने आशिया खंडात भारताकडेच साºयांचे लक्ष आहे. हाँगकाँगच्या रहिवासी व सध्या सिंगापूर विद्यापीठात शिकवणाºया प्रा. यांग ची यांचीदेखील याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, चीनचा विस्तारवाद वाढला आहे....चीनपासून अंतररशियातील शहरावरदेखील चिनी प्रसारमाध्यमे हक्क सांगत आहे. भारताच्या भूमिकेमुळे अमेरिका, जर्मनी, जपान व रशियादेखील चीनसोबत आंतरराष्ट्रीय जगतात उभा राहणार नाही. पंतप्रधान मोदी शुक्रवारी लेह दौºयावर गेले होते. जवानांशी संवाद साधताना त्यांनी चीनचा बुरखा फाडला.चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला, असेही निरिक्षण प्रा. यांग ची यांनी नोंदवले. चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे आर्थिक बोज्याखाली असलेल्या पाकिस्तानने मात्र चीनचे समर्थन केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन