अमेरिकी संयुक्त अधिवेशनातील मोदींचे भाषण रद्द

By Admin | Updated: September 18, 2014 01:46 IST2014-09-18T01:46:22+5:302014-09-18T01:46:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार होते. परंतु त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे

Modi's speech in US joint session canceled | अमेरिकी संयुक्त अधिवेशनातील मोदींचे भाषण रद्द

अमेरिकी संयुक्त अधिवेशनातील मोदींचे भाषण रद्द

काँग्रेस सभागृहाच्या अध्यक्षांनी लिहिले पत्र : मेडिसन स्क्वेअरसह तीन दिवसांत 27 सभा घेणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार होते. परंतु त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे आणि सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोईनर यांनी मोदी यांना स्वत: पत्र पाठवून त्याबाबतची सूचना कळविली आहे. 
तब्बल आठ वर्षाच्या व्हिसा बंदीनंतर मोदी या महिन्यात प्रथमच अध्यक्ष बराक ओबामा यांच्या खासगी निमंत्रणावरून अमेरिकेला भेट देणार आहेत. आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौ:यात मोदी किमान 27 सभांना संबोधित करतील. यात न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर येथील जाहीर सभेचाही समावेश आहे. 
या स्क्वेअरवर जाहीर सभा घेणारे ते पहिलेच जागतिक नेते असणार आहेत; परंतु अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे 88 सदस्य आणि 4 प्रभावशाली अमेरिकन सिनेट सदस्यांच्या संघटित मोहिमेनंतरही मोदींना काँग्रेसच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोईनर यांना त्याचे अतीव दु:ख झाले आहे. म्हणूनच त्यांनी स्वत: हे संबोधन रद्द झाल्याबद्दलचे कारण देणारे आणि त्याबद्दल खेद व्यक्त करणारे पत्र मोदींना लिहिले आहे. सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे संयुक्त अधिवेशन आयोजित करणो कसे कठीण आहे, याचा खुलासा बोईनर यांनी या पत्रत केला आहे. 
या सप्टेंबरमध्ये आपले (मोदींचे) संयुक्त अधिवेशनातील संबोधन शक्य होणार नसले तरी आपल्या पुढच्या अमेरिका भेटीत मात्र काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आपले स्वागत केले जाईल, असे या पत्रत बोईनर यांनी स्पष्ट केले आहे.
मोदींना स्वत: लिहिलेल्या या पत्रत बोईनर म्हणतात, ‘प्रिय पंतप्रधान, भविष्यात काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यास अमेरिकन प्रतिनिधीगृह किती उत्सुक आहे, हे सांगण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्या आगामी अमेरिका भेटीदरम्यान देण्यात आलेले संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याबाबतचे निमंत्रण या वर्षी सप्टेंबरअखेरीस सभागृहाच्या कार्यक्रमाच्या अनिश्चिततेमुळे आता पुढे ढकलण्यात येत आहे. या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस हे शक्य नसले तरी तुमच्या पुढच्या अमेरिका भेटीदरम्यान काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याबाबतचे निमंत्रण आम्ही आतापासूनच तुम्हाला देत आहोत.’
मोदींचे भाषण रद्द करण्यामागच्या कारणांचे स्पष्टीकरण देणारे हे पत्र पाठविल्यानंतर अमेरिकन अधिका:यांनी लगेच पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला, असे सूत्रंनी सांगितले. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत आणि सर्व खासदार त्या ठराविक दिवशी आपापल्या मतदारसंघातील निवडणूक प्रचारात व्यस्त राहतील. या मध्यावधी निवडणुकीमुळेच सप्टेंबरच्या मध्यात अधिवेशनाची सांगता केली जाणार आहे.  या कारणावरून मोदींचे संयुक्त अधिवेशनातील भाषण आयोजित करणो शक्य होणार नाही, असे या सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 

 

Web Title: Modi's speech in US joint session canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.