ंअल्पसंख्यकांसाठी मोदी द्रवले निधीची तरतूद केली दुप्पट अनपेक्षित पाऊल: दिल्लीतील पराभवानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:21+5:302015-02-11T23:19:21+5:30
हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : दिल्लीत मानहानीजनक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर नेली आहे.

ंअल्पसंख्यकांसाठी मोदी द्रवले निधीची तरतूद केली दुप्पट अनपेक्षित पाऊल: दिल्लीतील पराभवानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
ह ीश गुप्ता/ नवी दिल्ली : दिल्लीत मानहानीजनक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर नेली आहे.दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र विरोधकांसाठी हाती काठी घेतल्याचे दिसून आले. आयकर विभागाने दिल्लीत ऐतिहासिक विजय नोंदविणाऱ्या आम आदमी पार्टीसह काँग्रसेलाही मनी लाँड्रिगबद्दल (काळा पैसा)नोटीस बजावली. या दोन पक्षांसह ५० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास आणि वित्त महामंडळासाठी(एनएमडीएफसी)असलेली तरतूद १५०० कोटींवरून तीन हजार कोटी रुपये म्हणजे दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड आर्थिक दबाव आला असतानाच अल्पसंख्यकांसाठी तरतुदीत भक्कम वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे उल्लेखनीय. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अनपेक्षित होता, कारण अल्पसंख्यक समुदायातील गरजूंना स्वयंरोजगारासाठी सुलभ अटींवर कर्ज देता यावे म्हणून एनएमडीएफसीने याआधीच आपला पूर्ण निधी उपयोगात आणला आहे.