‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून मोदी बाद
By Admin | Updated: December 9, 2014 02:49 IST2014-12-09T02:49:22+5:302014-12-09T02:49:22+5:30
टाइम या प्रतिष्ठित मॅगङिानच्या मानाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या स्पर्धेत पहिल्या आठ जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळवता आले नाही.

‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून मोदी बाद
न्यूयॉर्क : टाइम या प्रतिष्ठित मॅगङिानच्या मानाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या स्पर्धेत पहिल्या आठ जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळवता आले नाही. मात्र त्यांना ‘रीडर्स पोल’मध्ये पहिली पसंती मिळाली. ‘पर्सन ऑफ द इयर’ विजेत्याच्या नावाची घोषणा 1क् डिसेंबर रोजी केली जाईल.
टाइम प्रकाशनाने पार पाडलेल्या वाचकांच्या ऑनलाईन पोलमध्ये 5क् लाख मतांमधून 16 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेत मोदींनी विजेत्याचा मान पटकावला. ऑगस्टमध्ये कृष्णवर्णीय अल्पवयीन मायकेल ब्राऊन याची गोळ्या घालून हत्या करणा:या श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी डॅरेन विल्सन याला निदरेष ठरविणारा ग्रॅन्ड ज्युरीचा निर्णय वादग्रस्त ठरला. फग्यरुसनमध्ये या निर्णयाविरुद्ध जोरदार निदर्शने झाली. या निदर्शनकत्र्यानी ‘रीडर्स पोल’मध्ये 9 टक्के मते घेत दुसरे स्थान पटकावले. भारतातील वाचकांनी अर्थातच मोदींना पहिली पसंती दर्शविली आणि तीच निर्णायक ठरली. अमेरिकेच्या तुलनेत अन्य देशाने अपेक्षेपेक्षा जास्त मते दिली, असे टाइमने स्पष्ट केले आहे.