मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीचा विरोध

By Admin | Updated: July 4, 2017 01:13 IST2017-07-04T01:13:51+5:302017-07-04T01:13:51+5:30

देशभरात जीएसटी लागू झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात आंदोलन पुकारले आहे.

Modi's opposition to GST in Gujarat | मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीचा विरोध

मोदींच्या गुजरातमध्येच जीएसटीचा विरोध

सुरत : देशभरात जीएसटी लागू झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात आंदोलन पुकारले आहे. सुरतमध्ये जीएसटीचा विरोध करण्यासाठी कापड मार्केट बंद करून व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि विरोधात घोषणाबाजी सुरु केली.

विरोध करत असताना व्यापारी आक्रमक झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे भाजपा सरकारवर टीका सुरू आहे. जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Modi's opposition to GST in Gujarat