मोदींच्या आईच्या अपहरणाचा फेसबुकवर पोस्ट, यंत्रणा संतर्क

By Admin | Updated: June 22, 2014 12:18 IST2014-06-22T12:17:14+5:302014-06-22T12:18:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांचे अपहरण केले तर आपण मोदींकडून काहीही करवून घेऊ शकतो असे पोस्ट एका तरुणाने फेसबुकवर टाकल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Modi's mother kidnaps Facebook post on Facebook | मोदींच्या आईच्या अपहरणाचा फेसबुकवर पोस्ट, यंत्रणा संतर्क

मोदींच्या आईच्या अपहरणाचा फेसबुकवर पोस्ट, यंत्रणा संतर्क

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२- पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांचे अपहरण केले तर आपण मोदींकडून काहीही करवून घेऊ शकतो असे पोस्ट एका तरुणाने फेसबुकवर टाकल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा पोस्ट फेसबुकवरुन काढून टाकण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांनी गुजरात पोलिसांना मोदींच्या आईच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. 
उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या इंझमाम कादरी नामक व्यक्तीने फेसबुकवर एक पोस्ट टाकले होते. यात मोदींच्या आईचे अपहरण केल्यास आपण मोदींकडून काहीही करुवून घेऊ शकू असे वादग्रस्त मत मांडण्यात आले होते. हा प्रकार समोर येताच फेसबुकवर त्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पण सुरक्षा यंत्रणांनीही या पोस्टची गंभीर दखल घेतली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अधिका-यांनी गांधीनगर येथे राहणा-या मोदींच्या आईच्या घराच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याचे वृत्त आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-यांनी गुजरात पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांशीही चर्चा केली असून मोदींच्या कुटुंबियांच्या सुरक्षेवर भर देण्याचे या चर्चेत सांगण्यात आले. 
दरम्यान, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी औपचारिक स्तरावर या पोस्टविषयी प्रतिक्रिया देत नाही. उत्तरप्रदेश पोलिस या पोस्टविषयी पुढील तपास करत आहे. 

Web Title: Modi's mother kidnaps Facebook post on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.