शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राहुल गांधी मंदिरातून बाहेर पडताच गर्दीतून आल्या मोदी मोदींच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:13 IST

अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.

अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी मोदींना 12वा प्रश्न विचारला आहे.छोटे व्यावसायिक त्रस्त आहेत, तर मोठे उद्योगपती मस्त आहेत. छोट्या व्यावसायिकांना जीएसटी आणि नोटाबंदीचा सामना करावा लागतो आहे. गुजरातमधल्या सूरत, राजकोटमधले व्यापार नष्ट केले आहेत. मोदी सरकार याची जबाबदारी घेणार का ?,  असा सवालही राहुल गांधींनी मोदींना विचारला आहे. गुजरातमध्ये काल पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान झालं आहे. ज्यात 68 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात यंदा कमी मतदान झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. 14 डिसेंबर रोजी दुस-या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मोदी-राहुल गांधी यांची परीक्षाया निवडणुका म्हणजे 2019मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकांची चाचणी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधी यांच्यासाठी ही नेतृत्वाची परीक्षा आहे. मोदी यांनी सौराष्ट्र व दक्षिण गुजरातेत 15 सभा घेतल्या, राहुल गांधी 7 दिवस राज्यात होते आणि अनेक सभांत भाषणे केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017