मोदींचे मंत्री अहंकारी!

By Admin | Updated: May 21, 2015 23:47 IST2015-05-21T23:47:38+5:302015-05-21T23:47:38+5:30

लोकसभा निवडणूक काळात आणि त्यानंतरही भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत काँग्रेसवर प्रहार करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी अचानक ‘शीर्षासन’ केले आहे.

Modi's minister proud! | मोदींचे मंत्री अहंकारी!

मोदींचे मंत्री अहंकारी!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काळात आणि त्यानंतरही भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत काँग्रेसवर प्रहार करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी अचानक ‘शीर्षासन’ केले आहे. रामदेव यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा करून मोदी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. केंद्रातील मंत्री अहंकारी झाले आहेत, असे रामदेव म्हणाले.
वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘मोदी वगळता भाजपाध्यक्ष अमित शहा, वित्तमंत्री अरुण जेटली व अन्य अनेक मंत्र्यांनी आपापले मोबाईल नंबर बदलले आहेत. ही बाब चांगली नाही.

त्यांनी जनतेचे ऐकावे.


त्यांच्या संपर्कात राहावे. पुन्हा निवडणुका लढवायच्या आहेत याचे त्यांनी भान ठेवले पाहिजे.’
रामदेव यांनी राहुल गांधींचे कौतुक करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षात प्राण फुंकला आहे. संपत असलेली काँग्रेस केवळ राहुल गांधी यांच्यामुळेच आता दिसू लागली आहे. शेतकरी आणि विकासाच्या मुद्यावर मोदी सरकारला संसदेत व संसदेबाहेर घेरण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे, असे रामदेव यांनी म्हटले आहे.

Web Title: Modi's minister proud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.