‘अस्वस्थ मानसिकतेचे मोदी हा चिंतेचा विषय’
By Admin | Updated: February 4, 2015 03:00 IST2015-02-04T03:00:12+5:302015-02-04T03:00:12+5:30
आपण सत्तेत आल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत सुटले आहेत.असे सांगत सुटणे हे त्यांच्या ‘अस्वस्थ मानसिकतेचे’ लक्षण आहे

‘अस्वस्थ मानसिकतेचे मोदी हा चिंतेचा विषय’
नवी दिल्ली : आपण सत्तेत आल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत सुटले आहेत.असे सांगत सुटणे हे त्यांच्या ‘अस्वस्थ मानसिकतेचे’ लक्षण आहे आणि निश्चितपणे हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसने मंगळवारी केली़
पत्रपरिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींवर प्रहार केला़ १६ मे पूर्वी भारताला कुणीही ओळखत नव्हते, असा आश्चर्यकारक दावा मोदींनी केला आहे़ त्यांचा हा दावा ‘अस्वस्थ मानसिकता’ दर्शविणारा आहे व हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे, असे शर्मा म्हणाले़ आपण पंतप्रधान झाल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, हा जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आतापर्यंतच्या देशाच्या सर्व पंतप्रधानांचा अपमान असल्याचेही शर्मा म्हणाले़