मोदींचा हात बघितला होता - ज्योतिष बेजान दारुवाला
By Admin | Updated: November 1, 2015 15:58 IST2015-11-01T15:53:32+5:302015-11-01T15:58:34+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या तांत्रिक भेटीवरुन निशाणा साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील ज्योतिष भेटीमुळे अडचणीत आले आहेत.

मोदींचा हात बघितला होता - ज्योतिष बेजान दारुवाला
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. १ - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या तांत्रिक भेटीवरुन निशाणा साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील ज्योतिष भेटीमुळे अडचणीत आले आहेत. ख्यातनाम ज्योतिष बेजान दारुवाला यांनी नरेंद्र मोदी यांचा हात बघितला होता असा दावा केला असून पुरावा म्हणून दारुवाला यांनी मोदींसोबतचा एक फोटोही जाहीर केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जदयू, राजदमधील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांचा एका मांत्रिकाची भेट घेतनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन मोदींनी रविवारी बिहारमधील सभेत नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला होता. देश तंत्र मंत्र नव्हे तर लोकशाहीच्या आधारे पुढे जातो असे मोदींनी म्हटले होते. मात्र मोदींनी टीका केल्याच्या काही तासांच्या आतच ख्यातनाम ज्योतिष बेनाम दारुवाला यांनी मोदींचा हात बघितला होता असा दावा केला आहे. इंदौरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींचा हात बघून त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे मी सांगितले होते अशी आठवणही त्यांनी पत्रकारांना सांगितली. पुरावा म्हणून दारुवाला यांनी मोदींचा हात बघतानाचा फोटो त्यांनी दाखवला असला तरी हा फोटो कधीचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही.