बाथरुममध्ये डोकवायची मोदींना सवय
By Admin | Updated: February 12, 2017 05:48 IST2017-02-12T05:48:00+5:302017-02-12T05:48:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतरांच्या बाथरुममध्ये डोकवायला, दुसऱ्यांच्या कुंडल्या वाचायला, गुगलवर इतरांची माहिती शोधायला फारच आवडते, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला.

बाथरुममध्ये डोकवायची मोदींना सवय
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतरांच्या बाथरुममध्ये डोकवायला, दुसऱ्यांच्या कुंडल्या वाचायला, गुगलवर इतरांची माहिती शोधायला फारच आवडते, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला.
उत्तर प्रदेशातील जनता विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि मोदींना सणसणीत उत्तर देईल, असा दावाही राहुल यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत केला. सोशल मीडियात सर्वाधिक विनोद राहुल गांधी यांच्यावर असल्याचा टोमणाही पंतप्रधानांनी मारला होता. त्यावर राहुल उदगारले की, गूगल सर्च करायला आपल्या पंतप्रधानांकडे भरपूर वेळ असल्याचे दिसते. (वृत्तसंस्था)
कुंडलीही अवश्य पाहा
देशात आज प्रचंड बेरोजगारी आहे. मोदी यांनी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. पण आजतागायत त्यापैकी एक टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. मोदी सातत्याने सुरक्षा, सर्जिकल स्ट्राइक व दहशतवादाबद्दल बोलतात. पण त्यांच्या काळातच सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
हरिद्वारमध्ये मोदी यांनी काँग्रेस
नेत्यांची कुंडलीच आपणाकडे आहे, असे विधान केले होते. त्यावर राहुल म्हणाले की, मोदी गेली दोन वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी काँग्रेसची जन्मपत्रिका आणि कुंडली अवश्य काढावी आणि वाचावी.