मोदींचे सरकार फक्त सूट-बूटवाल्यांसाठी, गरीबांसाठी नाही - राहुल गांधी

By Admin | Updated: September 19, 2015 16:07 IST2015-09-19T15:47:55+5:302015-09-19T16:07:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त सूटा-बुटातील लोकांनाच भेटतात, सामान्य लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली.

Modi's government is not just for exemption, for poor people - Rahul Gandhi | मोदींचे सरकार फक्त सूट-बूटवाल्यांसाठी, गरीबांसाठी नाही - राहुल गांधी

मोदींचे सरकार फक्त सूट-बूटवाल्यांसाठी, गरीबांसाठी नाही - राहुल गांधी

>ऑनलाइन लोकमत
पश्चिम चंपारण (बिहार), दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त सूटा-बुटातील लोकांनाच भेटतात, सामान्य लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंपारणमधील सभेतील भाषणादरम्यान हे सरकार फक्त श्रीमंतांसाठी आहे, गरीबांसाठी नाही अशी टीका राहुल यांनी केली. 
पंतप्रधानांचे दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्याचे वचन म्हणजे केवळ जुमला असल्याचे सांगत राहुल यांनी 'मेक इन इंडिया' मोहिमेचीही खिल्ली उडवली. सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेलं तरी कोणाला रोजगार मिळाला, महागाई कमी झाली का असा सवाल त्यांनी विचारला.
एकीकडे पंतप्रधान म्हणतात 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' आणि दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील मंत्री सुषमा स्वराज ललित मोदींना वाचवताना दिसतात तर मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यात त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव बाहेर येते, हा विरोधाभास असल्याची टीका त्यांनी केली. 

Web Title: Modi's government is not just for exemption, for poor people - Rahul Gandhi