काश्मिरला नरेंद्र मोदींची एक लाख कोटीच्या पॅकेजची ईद भेट?

By Admin | Updated: July 13, 2015 17:37 IST2015-07-13T17:37:12+5:302015-07-13T17:37:12+5:30

जम्मू व काश्मिरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ईदच्या दिवशी एक लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करत आगळंवेगळं गिफ्ट देण्याची शक्यता असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे

Modi's gift to Narendra Modi's Rs one lakh crore package? | काश्मिरला नरेंद्र मोदींची एक लाख कोटीच्या पॅकेजची ईद भेट?

काश्मिरला नरेंद्र मोदींची एक लाख कोटीच्या पॅकेजची ईद भेट?

>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १३ - जम्मू व काश्मिरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ईदच्या दिवशी एक लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करत आगळंवेगळं गिफ्ट देण्याची शक्यता असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. ७० हजार कोटी रुपये ते एक लाख कोटी रुपये या दरम्यान हे पॅकेज असेल आणि काश्मिरमध्ये पुराने हाहाकार माजवल्यानंतर विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी यापैकी भरीव रक्कम खर्च होईल असा होरा आहे.
जुलै १७ रोजी मोदी जम्मूमध्ये मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तर १८ - १९ जुलै रोजी ईद आहे, यापैकी एका दिवशी मोदी ही घोषणा करतिल असा अंदाज आहे. सध्या जम्मू व काश्मिरमध्ये भाजपा - पीडीपीचं सरकार असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याकडे निधीची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राची भरघोस मदत मोदी व भाजपाची प्रतिमा उंचावणा-या ठरतिल अशी शक्यता आहे. २०१४च्या पूराला १० महिने झाले तरी अद्याप अनेकांना नुकसानभरपाई मिळाली नसून राज्य सरकारविषयी जनतेच्या मनात रोष आहे जो कमी करण्यास या पॅकेजची मदत होईल. 
भाजपाशी युती केल्यामुळे काश्मिर खो-यात पीडीपीविषयी किंचित निराशेची भावना नागरिकांमध्ये असल्यामुळे मोदींनीच अशी घोषणा करावी असे मत भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. भाजपाच्या जम्मूतील नेत्यांनी भाजपाअध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली आहे.
नवी दिल्लीतल्या अनेक सरकारी अधिका-यांशी बौठका घेऊन पुनर्वसनाची योजना आखल्याचे आणि अरूण जेटलीसह अनेकांनी महत्त्वाची मदत केल्याचे जम्मू व काश्मिरचे अर्थमंत्री हासिब द्राबू यांनी सांगितले आहे.

Web Title: Modi's gift to Narendra Modi's Rs one lakh crore package?