काश्मिरात मोदींची दिवाळी

By Admin | Updated: October 24, 2014 04:36 IST2014-10-24T04:36:53+5:302014-10-24T04:36:53+5:30

फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्तांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी गुरुवारी काश्मीरच्या खोऱ्यात दाखल झाले.

Modi's Diwali in Kashmir | काश्मिरात मोदींची दिवाळी

काश्मिरात मोदींची दिवाळी

जम्मू-अमृतसर : फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्तांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी गुरुवारी काश्मीरच्या खोऱ्यात दाखल झाले. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग हेही त्यांच्यासोबत होते.
पंतप्रधान काश्मीरमध्ये दाखल होत असतानाच दोन वेळा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग करीत गोळीबार केला. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सातत्याने होत असलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून भारतीय लष्कराने
यंदा पाकिस्तानी सैन्याला दिवाळीची मिठाई दिली नाही. ईद आणि दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सीमेवरील सैनिकांकडून परस्परांना मिठाई देण्याची परंपरा आहे. बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या वर्षी
भारताने मिठाई न देण्याचा निर्णय घेतला. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पंजाब प्रांताचे अधिकारी अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. सियाचीनमध्ये जवानांना शुभेच्छा दिल्यानंतर मोदी श्रीनगरकडे रवाना होणार आहेत.

Web Title: Modi's Diwali in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.