शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची हवा संपली, राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 18:31 IST

देशातील जनता सर्वात मोठी शक्ती आहे. ही जनता जेव्हा वाटेल तेव्हा कुणालाही पप्पू बनवू शकते, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणणं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने ते गुजरात आणि देशातील इतर भागातील लोकांशी संवाद साधत आहेत. तसेच प्रचार करत आहेत त्यावरून ते देशाचं नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचं स्पष्ट होत असल्याचे रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशातील जनता सर्वात मोठी शक्ती आहे. ही जनता जेव्हा वाटेल तेव्हा कुणालाही पप्पू बनवू शकते, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला. आजतक या वृत्तवाहिनीने मंथन आजतक 2017 हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यातील मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. 

या मुलाखतीत  दोन्ही नेत्यांना शिवसेना-भाजपाच्या सध्याच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. भाजपसोबत आमची युती तीन दशकांची आहे.  त्यांचे काही मुद्दे आम्हाला पटले नाही तर आम्ही ते स्पष्ट बोलून दाखवतो असे संजय राऊत यांनी म्हटले. तर दोन्ही पक्षांचे धोरण काही प्रमाणात वेगळे असले तरीही मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात कॅबिनेटच्या बैठकीत कोणतेही मोठे मतभेद झालेले नाहीत असे विनोद तावडे यांनी म्हटले.मोदींची हवा संपली का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील हवा संपली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. देशात मोदींची हवा राहिली नसल्याचं गुजरातमधून स्पष्ट होत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जनता नाराज  जीएसटी लागू झाल्याने लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या मोदी सरकारच्या निर्णयामुळे जनता नाराज झाली आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर भाजपा महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर उभे राहण्यासाठीच प्रयत्न करेल आम्हाला शिवसेनेची गरज भासणार नाही अशीच आमची रणनीती असणार आहे असे तावडे यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चूकीचे राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चूक आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये ते आत्ता प्रभावीपणे काम करत आहेत. देशाच्या जनतेपेक्षा मोठे कोणीही नाही. ही जनता हवे त्याला पप्पू बनवू शकते असाही टोला राऊत यांनी लगावला.भाजपा आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी अशक्य यावेळी राऊत यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकणार नाही असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. पण राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत कुणाच्याबाबतीत ठोस काही सांगता येत नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीShiv SenaशिवसेनाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा