मोदींच्या वाराणसीत भाजपचा पराभव
By Admin | Updated: January 8, 2016 12:50 IST2016-01-08T12:30:01+5:302016-01-08T12:50:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे.

मोदींच्या वाराणसीत भाजपचा पराभव
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ८ - उत्तरप्रदेशातील जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी समाजवादी पक्षाने भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात वाराणसीत पराभवाचा धक्का दिला आहे. त्याच प्रमाणे राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या मेरठमध्येही सपा उमदेवार विजयी झाला आहे.
जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने एकहाती बाजी मारली आहे. ७४ पैकी एकूण ६० जागांवर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशात फक्त पाच जागांवर भाजपला विजय मिळवता आला.
वाराणसीमध्ये जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अपराजिता सोनकर यांनी भाजप उमेदवार अमित सोनकर यांचा १३ मतांनी पराभव केला. अपराजिता यांना ३० तर, अमित यांना १७ मत मिळाली.