मोदींच्या सूटबद्दल टीका अयोग्य - जेटली
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेला खास सूट १० लाख रुपयांचा असल्याची बाब राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रचारसभेत बोलून दाखविल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. मोदींचा सूट हा मुद्दाच नाही. सूट बनविण्याच्या खर्चाची आकडेवारी दिल्याने देशाचे राजकारण घसरल्याचेच दिसून येते, असे जेटली एका निवेदनात म्हणाले.

मोदींच्या सूटबद्दल टीका अयोग्य - जेटली
न ी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेला खास सूट १० लाख रुपयांचा असल्याची बाब राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रचारसभेत बोलून दाखविल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारणाचा स्तर खालावल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. मोदींचा सूट हा मुद्दाच नाही. सूट बनविण्याच्या खर्चाची आकडेवारी दिल्याने देशाचे राजकारण घसरल्याचेच दिसून येते, असे जेटली एका निवेदनात म्हणाले. मोदींनी कोट्यवधींचा काळा पैसा विदेशातून आणण्याचे आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तुम्हाला हे पैसे मिळाले काय? तुम्हाला काहीही मिळाले नाही. मोदींनी ओबामांना भेटण्यासाठी १० लाख रुपयांचा सूट परिधान केला होता, असे राहुल गांधी यांनी दिल्लीतील प्रचारसभेत म्हटले. हैदराबाद हाऊस येथे ओबामांना भेटताना मोदींनी बंद गळ्याचा सूट परिधान केला होता. त्यावर मोदींचे नाव अंकित असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.