मोदींचे बजेट ११ जुलैला?

By Admin | Updated: June 19, 2014 02:53 IST2014-06-19T02:53:15+5:302014-06-19T02:53:15+5:30

नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलैला सादर होण्याची शक्यता आहे.

Modi's budget on July 11? | मोदींचे बजेट ११ जुलैला?

मोदींचे बजेट ११ जुलैला?

फराज अहमद, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ११ जुलैला सादर होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन ७ ते २८ आॅगस्ट असे चालेल. या संदर्भातील निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. परंतु त्याची औपचारिक घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मान्यतेची मोहर उमटल्यानंतर केली जाणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. परंपरेप्रमाणे रेल्वे अर्थसंकल्प ९ जुलैला सादर होईल. १० जुलैला आर्थिक पाहणी अहवाल आणि ११ जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनात मोदी सरकारचे प्राधान्य आर्थिक कामकाजाला राहील. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला संसदेची मान्यता मिळविण्यात येईल. सध्याच्या कायद्यानुसार मिश्रा यांची कोणत्याही सरकारी पदावर नियुक्ती केली जाऊ शकत नाही. मोदींनी सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी मिश्रा यांची नियुक्ती केली होती. त्यासाठी वटहुकूम काढला होता.

Web Title: Modi's budget on July 11?