मोदींची अमेरिका वारी
By Admin | Updated: October 2, 2014 01:04 IST2014-10-02T01:04:24+5:302014-10-02T01:04:24+5:30
नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे श्रोत्यांना अवघडल्यासारखे झाले होते. न्यूयॉर्कमध्ये थिंक टँकच्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी भारत-अमेरिका यांच्या संबंधांची तुलना विवाहाशी केली होती.

मोदींची अमेरिका वारी
मोदींच्या भाषणातील ‘वास्तव’
नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे श्रोत्यांना अवघडल्यासारखे झाले होते. न्यूयॉर्कमध्ये थिंक टँकच्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी भारत-अमेरिका यांच्या संबंधांची तुलना विवाहाशी केली होती. मोदी म्हणाले होते की पतीपत्नीमध्येही नेहमीच सलोख्याचे संबंध असतील, असे नाही परंतु ते एक दीर्घ काळासाठीचे बंधन असते. श्रोत्यांमधील काहींनी तसा विचारही केला असेल, कारण मोदींचा विवाह ते अगदीच पोरगेलेसे असताना झाला होता. नंतर त्यांनी ते सोडून देण्याचा निर्णय घेतला त्याला आता अनेक दशके झाली.
मेजवानीस मिशेल ओबामा अनुपस्थित
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीस अध्यक्ष ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा उपस्थित राहिल्या नाहीत. या मेजवानीच्या निमंत्रण पत्रत अध्यक्ष व फस्र्ट लेडी यांच्यातर्फे मेजवानी असल्याचे म्हटले होते. एकतर नरेंद्र मोदी एकटेच, त्यातही त्यांचा उपवास! त्यामुळे मिशेल ओबामा मिलाउके येथून परतल्याच नाहीत. त्यामुळे मेजवानी सरकारी बनली. दोन्ही देशांचे अधिकारी आणि मंत्री यांनीच खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.
ओबामा म्हणाले, केम छो
ओबामा यांनी मोदींचे स्वागत ‘केम छो’ या गुजराती वाक्याने केले. साऊथ अँड सेंट्रल आशियाच्या सहायक परराष्ट्र मंत्री निशा बिसवाल यांनी ओबामा यांना हे शब्द शिकविले. बिसवाल या गुजराती असून त्या सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मोदींसाठीच्या भोजन समारंभास उपस्थित होत्या.
भारत-अमेरिका यांचे नाते
न्यूयॉर्कमधील विचारवंताशी बोलताना मोदी यांनी भारत व अमेरिकेतील संबंधाची तुलना विवाहाशी केली. पती-पत्नी यांचे नेहमीच गोडीगुलाबीचे असते असे नाही; पण तरीही ते वर्षानुवर्षे एकत्र राहतात, असे पंतप्रधान म्हणले. किशोरवयातील आपले विवाहबंधन झुगारून एकटे राहणा:या मोदी यांना पती-पत्नींच्या संबंधाची काय माहिती, असा विचार या बैठकीत सहभागी असणा:या अनेकांनी केला.
नवरात्रचा उपवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौ:यात नवरात्रचा उपवास होता आणि त्यांनी फक्त गरम पाणी प्यायले; पण हॉटेलमधील डिनरमध्ये वाईन व मांसाहारी पदार्थ दिले जात. पंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोघेही शाकाहारी. त्यामुळे भारतीय अधिकारी हॉटेलमध्ये आधीच ही माहिती देत असत. त्यांच्या टेबलवर वाईन व मांसाहारी पदार्थ येत नसत. गुलाबाची फुले व ध्वज- वॉशिंग्टन डीसी येथे मोदी ब्लेअर हाऊसमध्ये राहत असत. परराष्ट्रमंत्रलयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये केलेल्या पुष्परचनेत केशरी, पांढरी व हिरवी गुलाबाची फुले सजवली होती.मोदींच्या सन्मानार्थ भारतीय ध्वज असा बनवण्यात आला होता.
मोदींच्या स्वागतात कल्पकता
भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी मंगळवारी टि¦टरवर अपलोड केलेला फोटो वेगळाच होता. मोदी यांचा मुक्काम ज्या डीसीतील ब्लेअर हाऊसमध्ये होता तेथे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांची फुले वापरून फुलदाणी सजविण्यात आली होती. त्या फुलदाणीचा हा फोटो होता. मोदी यांचे स्वागत अशा कल्पकतेने करण्यात आले होते.
अमेरिका भेटीबद्दल मोदी समाधानी
वॉशिंग्टन- थँक यू अमेरिका असे म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपला पाच दिवसांचा दौरा आटोपला, हा दौरा अत्यंत यशस्वी व सामाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
येथील राजकीय निरीक्षकांच्या मते अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्यास तसेच भारत, अमेरिका संबंधाना नवा उजाळा देण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत.