शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 14:55 IST

परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयात विचार सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याची माहिती परराष्ट्र विभागाकडून मिळत आहे. परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशाच्या हवाई क्षेत्रातून किर्गिस्तानच्या बिश्केक येथे जाईल. 

परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयात विचार सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) कडून शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकला रवाना होतील. सुरुवातीला अशी बातमी आली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जातील. यासाठी पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.  

पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील 2 मार्ग खुले केले आहेत. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागलं आहे. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये दोन्ही देशांमध्ये काश्मीरसह अन्य राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र भारताने अद्याप इमरान खान यांच्या पत्राला उत्तर दिलं नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची एससीओच्या बैठकीत भेटही होणार नसल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान