सुधारित -पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:23+5:302014-12-20T22:27:23+5:30
जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

सुधारित -पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ
ज ईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढतंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय : २६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणारपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) एप्रिल २०१५ मध्ये घेतल्या जाणार्या जेईई मेन्स परीक्षेचे ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या पुढे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.विद्यार्थी,पालक व काही शाळांनी ऑनलाईन अर्ज जमा करण्यास व फोटो अपलोड कारण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २७ डिसेंबरपर्यंत परीक्षेचे शुल्क बँकेत चलनाच्या माध्यमातून भरता येतील. तसेच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यामातून सुद्धा शुल्क भरण्याची सुविधा आहे. येत्या ४ एप्रिल रोजी जेईई मेन्स परीक्षेचा ऑफलाईन पेपर तर १० आणि ११ एप्रिल रोजी ऑनलाईन पेपर होणार नाही. (प्रतिनिधी)