मोदींनी वाजपेयी, नवाझ शरीफ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By Admin | Updated: December 25, 2014 12:45 IST2014-12-25T10:22:08+5:302014-12-25T12:45:45+5:30
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या

मोदींनी वाजपेयी, नवाझ शरीफ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. नाताळच्या सणानिमित्तही मोदींनी जगभरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाजपेयींच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त तसेच भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणार आहेत.
"अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा", असे ट्विट मोदींनी केले आहे.
तसेच नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना आपण ईश्वरचरणी करतो, असे नमूद करत मोदींनी शरीफ यांना त्यांची मुलगी मरियम शरीफ हिच्या अकाऊंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
केंद्र सरकारने अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्यांना व मदन मोहन मालवीय यांना सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला. नरेंद्र मोदी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाणार असून ते पंडीत मदनमोहन मालवीय यांना नमन करणार आहेत.