मोदी मला मारुन टाकतील - अरविंद केजरीवाल
By Admin | Updated: July 27, 2016 17:57 IST2016-07-27T17:57:06+5:302016-07-27T17:57:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी मला इतके वैतागले आहेत की, ते मला मारुन टाकतील असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केले.

मोदी मला मारुन टाकतील - अरविंद केजरीवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी मला इतके वैतागले आहेत की, ते मला मारुन टाकतील असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केले.
आम आदमी पक्षाच्या आमदाराला झालेली अटक, त्यानंतर आप खासदार भगवंत मानच्या संसदेच्या व्हिडीओ चित्रीकरणावरुन झालेला वाद या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी व्हिडीओ संदेशातून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
अनेक कारणांमुळे मोदी आम आदमी पक्षावर संतापले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ते आप सरकारच्या चांगल्या कामावर मोदी नाराज आहेत. मोदींना आपचे यश पचवणे जड जातेय असा आरोप केजरीवालांनी केला. पंतप्रधान मोदी संतापाच्या भरात निर्णय घेतात ते देशासाठी घातक आहे असेही केजरीवाल म्हणाले.