मोदी ‘माध्यमां’शी थेट संवाद साधणार
By Admin | Updated: October 26, 2014 02:05 IST2014-10-26T02:05:19+5:302014-10-26T02:05:19+5:30
एरवी प्रसार माध्यमांना टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पत्रकारांसाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला.
मोदी ‘माध्यमां’शी थेट संवाद साधणार
नवी दिल्ली : एरवी प्रसार माध्यमांना टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पत्रकारांसाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. मीडियाशी सखोल, व्यापक आणि थेट संवाद साधण्यासाठी आपण लवकरच नवी व्यवस्था करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
भाजपाच्या मीडिया विभागाने पक्ष मुख्यालयात हा ‘दिवाळी मंगल मिलन’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोठय़ा संख्येत उपस्थित असलेल्या पत्रकारांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘कधीकाळी मी देखील तुमच्या (पत्रकार) प्रतीक्षेत खुच्र्या लावत होतो. काही वर्षापूर्वी तुमच्याशी थेट आणि जवळचा संबंध ठेवत होतो. ते दिवस काही और होते. मनमोकळ्या चर्चा व्हायच्या. तुमच्याशी चांगली मित्रता झाली होती. त्याचा फायदा मला गुजरातमध्ये झाला.’
मीडियाशी तसेच मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत देताना मोदी पुढे म्हणाले, ‘तुमच्यासोबत असलेले ते जुने सखोल व मैत्रीपूर्ण संबंध अधिक व्यापक कसे होतील यासाठी मी एखादा मार्ग शोधतो आहे. तुमच्यासोबत वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे मी शोधत आहे. त्याचा मार्ग येत्या काही दिवसात मिळेल. असे झाले तर तुम्हाला मीडियामार्फत काही कळण्याऐवजी थेट माङयाकडून माहीत करून घेण्याचा फायदा होईल. ब:याच गोष्टी तुम्ही लिहू शकत नाही. परंतु प्रत्यक्ष बोलून त्या गोष्टींची माहिती मिळते आणि अशा गोष्टी बहुमूल्य असतात.’
आपल्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’बाबत जागृती निर्माण करण्यात दिलेल्या योगदानाबाबत मोदींनी प्रसार माध्यमांचे आभार मानले. ‘तुम्ही तुमच्या लेखणीला झाडू बनविल्याबद्दल तुमचे आभार. ही फार मोठी सेवा आहे, असे मला वाटते. केवळ पीएमने हातात झाडू घेतल्याने हे अभियान सफल होणार नव्हते,’ असे मोदी म्हणाले.
या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ मंत्री राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)