शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या भाषांतरकाराचा 'घोटाळा'; म्हणाला, 'मोदी देशाचं वाट्टोळं करताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 17:01 IST

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारनं लिंगायतांच्या मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याकांच्या दिलेल्या दर्जानं आधीच भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

बंगळुरू- कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारनं लिंगायतांच्या मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी त्यांना अल्पसंख्याकांच्या दिलेल्या दर्जानं आधीच भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. परंतु त्यातच भाजपाच्या हिंदीतून कन्नडमध्ये भाषांतर करणा-या व्यक्तीनं अमित शाहांना आणखी अडचणीत आणलं आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वीच सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारवर अमित शाहांनी टीका केली होती. भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर त्यासाठी येडियुरप्पा सरकार पात्र असे, असे अनवधानानं अमित शाह बोलून गेले होते. त्याच प्रमाणे भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांचं भाषण चुकीच्या पद्धतीनं भाषांतरित केलं आहे. येडियुरप्पा आणि मोदी मिळून देशाला प्रगतिपथावर नेतील, असं अमित शाह म्हणाले होते. परंतु भाषांतरकारानं त्याचं काही तरी भलतंच भाषांतर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काहीही करणार नाहीत. ते देशाला उद्ध्वस्त करतील. तुम्ही त्यांना मतदान करू नका, अमित शाह यांच्या विधानाचं प्रल्हाद जोशी यांनी असं भाषांतर केलं आहे. 

उत्तर भारतीय भाजपा नेत्यांना दक्षिण भारतात प्रचार करण्यासाठी अनेकदा भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये सभेसाठी आले होते, तेव्हाही त्यांनी हिंदीतून भाषण केलं होतं. तेव्हा ते भाषण अनेक लोकांना समजलंच नव्हतं. कर्नाटकातील लोकांना हिंदी भाषा समजत नसल्यानं ब-याचदा अमित शाह यांचं हिंदीतील भाषण केंद्रीय मंत्री अनंत हेगडे कन्नडमध्ये भाषांतरित करत असतात. तर काही ठिकाणी हे काम प्रल्हाद जोशी करतात. आता त्यांनी सांगितलं की, विधानसभा क्षेत्रातील नेते हिंदीचं कन्नडमध्ये भाषांतर करून देणार आहेत, त्यावेळीच हिंदीतून कन्नडमध्ये ट्रन्सलेशन करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते मदत करतील. भाजपा भाषांतरासाठी नेते आणि ट्रान्सलेटर यांची मदत घेत आहेत. त्यामुळेच अशा चुका होत असल्याच स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८